दाक्षिणात्य सुपरस्टार विजय ठरला सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता

चेन्नई : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांची चित्रपट इंडस्ट्रीमध्ये सर्वाधिक फी घेणाऱ्या अभिनेत्यांमध्ये गणना केली जाते.त्यांना दक्षिणेकडे देव मानल्या जाणाऱ्या रजनीकांत यांचे चित्रपट अजूनही तुफान चालतात. त्यामुळे निर्माते वाटेल ती फी देण्यासही मागेपुढे पाहात नाहीत. परंतु आता रजनीकांत यांना धोबीपछाड देत सुपरस्टार विजय तमिळ इंडस्ट्रीमध्ये सर्वाधिक फी घेणारा अभिनेता ठरला आहे. या अभिनेत्याने ‘थलपथी ६५’ साठी १०० कोटी रुपये घेतल्याचे वृत्त आहे.

याबाबत दै.भास्कर’ या वृत्त पत्राने दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता विजयने सन पिक्चर्सच्या ‘थलपथी ६५’ या चित्रपटासाठी १०० कोटी रुपयांची फी घेतली आहे. सन पिक्चर्सने यातील ५० टक्के अर्थात ५० कोटी रुपये विजयला दिल्याचेही वृत्त आहे.
याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. याआधी सुपरस्टार रजनीकांत यांनी एका चित्रपटासाठी सर्वाधिक फी घेतली होती. रजनीकांत यांनी ‘पोगल’ या सणाच्या दिवशी प्रदर्शित होणाऱ्या दरबार या चित्रपटासाठी ९० कोटी रुपये घेतले होते. आता अभिनेता विजयने रजनीकांत यांना फी च्या बाबतीत मागे सोडले आहे.

दरम्यान, विजय सध्या चित्रपट दिग्दर्शक लोकेश कनगराज यांच्या ‘मास्टर’ या चित्रपटाच्या चित्रिकरणामध्ये व्यग्र आहे. या चित्रपटामध्ये विजय कॉलेज प्रोफेसरची भूमिका साकारत आहे. विशेष म्हणजे विजय आणि विजय सेतुपती पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शीत होणारा हा चित्रपट चाहत्यांसाठी पर्वणी असणार आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा