कोणतेही आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर एक नाजूक कोमल अशी प्रतिमा उभी राहते. जाईजुईचं, प्राजक्ताचं, मोगरा, अबोली, गुलाब अशा प्रकारची अनेक फुले आपल्याला आठवतात. परंतु पण या प्रतिमेला धक्का देणारी काही फुलं पण असतात की ज्यांचा आपण विचारही करू शकत नाही. आज आपण जगातील सर्वात मोठ्या फुलांबद्दल माहिती घेणार आहोत.
जगातील सर्वात मोठे फुल म्हणून “राफ्लेशिया” म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. साधारणतः या फुलाचा आकार १ मीटर रुंद तर वजन १० किलोग्रामपर्यंत असू शकतो. इंडोनेशियामध्ये नुकताच यापूर्वी कधीही न बघितलेल्या एवढ्या मोठ्या आकाराच्या “राफ्लेशिया” फुलाचा शोध लागला आहे. या फुलाचा व्यास हा ४ फुट एवढा प्रचंड आहे.
यापूर्वीचा रेकॉर्ड हा २०१७ सालच्या राफ्लेशिया फुलाचा होता. हे फूल सुद्धा त्याच जागी उगवलं होतं जिथे यंदाचं रेकॉर्ड ब्रेक करणारं फूल उगवलं आहे. दोघांमध्ये केवळ ४ इंचाचा फरक आहे.
राफ्लेशिया फूल परजीवी असतं. त्याला पाने नसतात. इतर झाडांच्या अन्न आणि पोषक घटकावर ते जगतं. या फुलाचं वयोमान अवघ्या ६ ते ७ दिवसांपुरतंच असतं. त्यानंतर फुल कुजून नष्ट होतं.
राफ्लेशियाची परागीकरण म्हणजे एका फुलावरील परागकण दुसऱ्या फुलावर नेण्याचं काम एका विशिष्ट पद्धतीने घडतं. फुलाच्या आतून सडलेल्या मांसासारखा वास येतो. या दुर्गंधीमुळे लहानसहान कीटक फुलाच्या पोकळीकडे आकर्षित होतात. या कीटकांच्या मार्फत परागीकरण घडून येतं. या गुणधर्मामुळे राफ्लेशियाला ‘मृतदेहाचं फूल’ असेही नाव या फुलाला मिळालं आहे. फुलाला स्पर्श केल्यास त्वचेला स्पर्श करत असल्याचा भास होतो.
इंडोनेशिया आणि मलेशिया या देशांमध्ये हे “राफ्लेशिया” हे फुल आढळतं. १७९१ आणि १७९४ च्या काळात राफ्लेशियाचा शोध लागला. पण पाश्चात्य जगाला त्याबद्दल माहिती व्हायला आणखी काही वर्ष गेली. १८१८ साली पुन्हा एकदा शोध मोहीम घेऊन फुलाचा शोध घेण्यात आला. इंडोनेशियाच्या एका मार्गदर्शकाने हे फूल शोधून काढलं आहे. या मोहिमेचे मुख्य असलेले ‘थॉमस स्टॅमफर्ड रॅफल्स’ यांच्या नावावरून फुलाला “राफ्लेशिया” असे नाव मिळालेलं आहे. या बाबत संकेतस्थळांने माहिती प्रसिद्ध केलेली असल्याचे समोर आले आहे.