नवी दिल्ली : देशातील सर्व महामार्गांवरचे स्पीडब्रेकर हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
विशेषत: टोलनाक्यांजवळचे स्पीडब्रेकर हटवण्याला प्राधान्य देण्यात येणार असल्यामुळे वाहन चालकांसाठी पर्वणीच असल्याचे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
देशात नुकतीच फास्टॅग प्रणाली रस्ते व वाहतूक विभागाने लागू केली. यापुर्वी टोलनाक्यांवर टोल भरण्यासाठी वाहनांना थांबावे लागत होते. पण वाहनांना फास्टॅगमुळे टोलनाक्यावर थांबण्याची आवश्यकता उरली नाही. त्या पार्श्वभूमीवर महामार्गांवरचे स्पीड ब्रेकर देखील हटवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्यामुळे अडथळ्यांविना प्रवास करणे वाहनांना शक्य होणार आहे.