अहमदनगर : नगरचे सुपुत्र अक्षय राजेश गुंदेचा हे वयाच्या एकवीसाव्या वर्षी गुजरात (सुरत) येथे जैन धर्माची दिक्षा घेणार आहेत.
याबद्दल महावीर चषक परिवारतर्फे युवाचार्य प.पु.महेंद्रऋषीजी मसा, अन्य साधुगण व अहमदनगर ओसवाल पंचायत सभाचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते मानपत्र देऊन त्याचा सत्कार करण्यात आला.
युवाचार्य पपु.महेंद्रऋषीजी म्हणाले की, “आचार्य आनंदऋषीजी यांचा शांती व प्रेमाचा संदेश समाजातील प्रत्येक गरजूपर्यंत पोहचविण्यासाठी अक्षय गुंदेचा या युवकाने स्व:य प्रेरणेने दिक्षा घेण्याचा मार्ग स्वीकारला आहे.
सर्वसुख साधने सोडून, मोहपाशाच्या बंधनात न अडकता नगरच्या पावनभूमीसाठी त्याचा त्याग अनमोलच आहे.
परिवार व संसार सुखाचा त्याग करून आचार्य आनंदऋषीची शिकवण, संत परंपरा जोपासण्याचे अनमोल कार्य अक्षय गुंदेचा यांच्या हातून निश्चित घडेल.”
याबाबत लनरेंद्र फिरोदिया म्हणाले, सध्याच्या काळात धार्मिकता व संस्कार जोपासण्यासाठी अक्षय गुंदेचा यांचा आदर्श युवापिढीला अत्यंत मार्गदर्शक व प्रेरणा देणारा ठरेल.
खरा आनंद व सुख कशात आहे हे कळावे, यासाठी दिक्षा मार्गाचे महत्व यातून समाजातील सर्व घटकांना निश्चित समजेल.
यावेळी मर्चंट बँक संचालक संजय चोपडा, जैन धर्मशाला अध्यक्ष राजेंद्र गांधी, सचिन मुथा, केतन गुंदेचा, आदर्श व्यापारी मित्रमंडळ राजेंद्र तातेड, अनिल दुगड, रवी बाकलीवाला, सुनील वावरे, विकास सुराणा, प्रवीण शिंगवी, मयूर पितळे, प्रीतम पोखरणा, मनिषा गुंदेचा व मान्यवर उपस्थित होते.