उजनी जलाशयात मगरीचे वास्तव्य

इंदापूर : उजनी धरण परिसरातील भिमानगर आणि कंदर या दोन ठिकाणे मगरीला पकडून वन विभागाच्या स्वाधीन केल्याने मागील काही दिवसात उजनी जलाशयात मगरीचे वास्तव्य असल्याचे निष्पन्न झाले होते.
मात्र त्यानंतर भिगवण, पळसदेव परिसरात मगरीचे दर्शन घडू लागले. परंतु येथील मच्छिमार मासेमारी करण्यासाठी सकाळच्या प्रहरी पाण्यात गेल्यानंतर त्यांना पाण्यावर एका मेलेल्या मगरीच्या पिल्लाचे दर्शन घडले. मगरी पाठोपाठ आता मगरीच्या पिल्लांचे दर्शन घडल्याने मगरीचे उत्पादन वाढत असल्याने मच्छिमार बांधवांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
गेली दोन वर्षात उजनी जलाशयातील भिमानगर आणि कंदर या ठिकाणी प्रत्यक्षात समोर मगरी पकडल्याचे पहावयास मिळाले आहे. त्यानंतर भिगवण, धुमाळ वाडी, कुंभारगाव भागातील मच्छीमार व शेतकऱ्यांना मगरीचे दर्शन घडत होते. यानंतर पळसदेव भागात देखील मच्छीमाराना गेल्या चार पाच दिवसांपूर्वी मासेमारी करीत असताना विहिरीजवळील मोकळ्या जागेत दुपारच्या प्रहरी उन्हात बसलेली मगर पहावयास मिळाली.
त्यानंतर दोन दिवसाने त्याच ठिकाणी आणखी दोन मच्छीमारांना या मगरीचे दर्शन घडले. नजीकच्या परिसरातील दाट झाडी, मध्यभागी विहिरीचा परिसर यामुळे या ठिकाणी मगरीने आपले वास्तव्य निर्माण केले आहे. या ठिकाणी मुक्काम ठोकल्याचे दिसत आहे. शनिवार दि.४ रोजी सकाळच्या वेळी बलभीम भोई मासे पकडण्यासाठी नदीला गेल्यानंतर, पाण्यावरती मगरी सदृश्य प्राणी पाण्यावरती तरंगत नदीकाठावर वाहत येत असल्याचे दिसले. त्यानंतर त्यांनी शंकेचे निरसन करण्यासाठी आपली होडी त्याच्या नजीक नेऊन पाहिले असता, ते मगरीचे लहान पिल्लू असल्याचे त्यांनी सांगितले.
मगरीचे पिलू पाच ते सहा किलो वजनाचे असून तीन फूट लांबीची असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे उजनी जलाशयात मगरी बरोबरच, मगरीच्या पिल्लांचे ही दर्शन घडू लागल्याने, आता मच्छिमारांमध्ये घबराहटीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे आता मच्छिमारांच्या उपजीविकेचा प्रश्न भेडसावू लागला आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा