मांगुर च्या तळ्यांमुळे भटक्या कुत्र्यांच्या वावरात वाढ: इंदापूर

इंदापूर (प्रतिनिधी) दि.१२: जिल्ह्यात दररोज कुठे ना कुठे पिसाळलेले कुत्रे चावल्याच्या बातम्या येत आहेत. शहर व जिल्ह्यात या भटक्या कुत्र्यांच्या उच्छादामुळे नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत. मात्र याची पर्वा , ना नगरपालिकेला , ना ग्रामपंचायतीला आहे. त्यामुळे या भटक्या कुत्र्यांचा विषय गंभीर बनला आहे.

मागील काही दिवसांपूर्वी कालठण क्रमांक १ (ता. इंदापूर ) येथे चार भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात ११ वर्षाची    संध्या शाहू उमप  हीी मुलगी गंभीर जखमी झाली होती.याा ठिकणी आरोग्य उपकेंद्र असून देखील तिला उपचार न मिळल्याने तिला पुणे येथील ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

उजनी पाणलोट क्षेत्रातील मांगुर तळी असलेले गाव म्हणून इंदापूर कालठण क्रमांक १ ची ओळख. या परिसरात का वाढलाय भटक्या कुत्रांचा वावर
याबाबत महिती घेतली असता या परिसरात मांगुर माश्यांची तळी मोठ्या प्रमाणात आहेत. या माश्यांचे प्रमुख खाद्य म्हणजे टाकाऊ मांस. बाहेरून आणलेले टाकाऊ मांस एका मशीन मध्ये त्याचे बारीक तुकडे केले जातात. ते तुकडे मांगुर च्या तळ्यात टाकतात. ह्या टाकाऊ मांसामुळे भटकी कुत्री अक्षरशः माणसाला देखील सहज फाडु शकतात. तसेच या परिसरात प्रचंड प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे.

भटक्या कुत्र्यांची समस्या इतकी गंभीर असूनही कायमस्वरुपी इलाज करण्याचा प्रयत्न आजपर्यंत झालेला नाही शेतकरी  व नागरिकांना रात्री शेतात दारी देण्यासाठी जीव मुठीत धरूनच जावे लागते. कारण कोपऱ्या-कोपºयावर विशेषतः या परिसरात ही कुत्री टोळीने असतात.

मांगुर तळी चालवतात बडे धेंडे

स्थानिकांनी याविषयी मत्स्य विभाग आणि महसूल विभाग आणि आरोग्य विभागाला याविषयी वेळोवेळी तक्रारी केल्या. महसूल आणि मत्स्य विभागाचे अधिकारी नाममात्र कारवाईसाठी या ठिकाणी येतात मात्र या धेडयांकडून आपले खिसे गरम करून घेतात मात्र यावर कोणतीही कारवाई करत नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

यापुर्वी हि या मोकाट कुत्र्यांनी जवळपास २५ ते ३० शेळ्या खाल्ल्या आहेत तर गाई म्हशी यांच्या वर हल्ला करुन जखमी केले  ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे. दरम्यान आता या मोकाट भटक्या कुत्र्यांनी आपला मोर्चा लहान मुलांकडे वळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

फोटो ओळ – याच मांगुर च्या तळ्यांमुळे भटकी कुत्री या ठिकाणी येतात.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा