आता भारतातही सुरु करणार एन बी ए लीग

नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनचे कमिशनर अ‍ॅडम सिल्व्हर यांनी भारतातही ‘एनबीए’ लीग सुरू करण्याचा विचार असल्याचे म्हटले आहे. या खेळाची लोकप्रियता लक्षात घेऊन हा विचार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
  सिल्व्हर म्हणाले
▪ आम्ही अमेरिकेबाहेर पडू शकू असा विचारही 5 वर्षांपूर्वी केला नव्हता. पण तंत्रज्ञानात होणाऱ्या आधुनिक बदलांमुळे जगभरातील चाहत्यांना कोणत्याही ठिकाणी सामन्याचा आनंद लुटता येणार आहे.
▪ मूळ मुंबईचे असलेले सॅक्रॅमेंटो किंग्जचे मालक विवेक रणदिवे यांनीही भारतात एनबीए बास्केटबॉल लीगच्या आयोजनाविषयी आग्रह धरला आहे.
▪ रिलायन्स उद्योग समूह तसेच सोनी नेटवर्कच्या सहकार्याने आगामी काळात भारतात एनबीए लीगचे आयोजन करण्यात येईल.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा