भाडेकरारासंदर्भात मोठी बातमी

पुणे: सरकारी कार्यालयांसह विविध ठिकाणी पत्त्याचा पुरावा म्हणून रजिस्टर्ड भाडेकरार अनिवार्य आहे. काही ठिकाणी भाडेकरार म्हणून खासगीत शंभर, पाचशे रुपयांच्या मुद्रांकावर नोटरी करून भाडेकरार करण्यात येतो. मात्र, नोंदणी व मुद्रांक विभागाच्या ऑनलाइन रजिस्टर्ड भाडेकरारामुळे नोटराइज्ड भाडेकरार हद्दपार झाला.

घर, दुकान भाडेतत्त्वावर घेण्यासाठी, व्यवसायासाठी शॉप ॲक्‍ट’ साठी पत्त्याचा पुरावा म्हणून भाडेकरार लागतो. अनेक ठिकाणी भाडेकराराची गरज भासते. त्यासाठी नोंदणी व मुद्रांक विभागाकडून ऑनलाइन रजिस्टर्ड भाडेकरारासाठी स्वतंत्र पोर्टलची सुविधा आहे. मुद्रांकावर नोटराईज्ड भाडेकरार अधिकृत नाही. त्यामुळे ऑनलाइन भाडेकराराकडे कल आहे.
ऑनलाइन भाडेकरार नोंदणीमुळे स्टॅम्पपेपरवरील नोटराइज्ड करार बऱ्यापैकी बंद झाले आहेत. ऑनलाइन भाडेकरारानंतर भाडेकरूची माहिती पोलिसांना पाहण्यासाठी लॉगइन दिला आहे. त्यामुळे घरमालक किंवा भाडेकरूंना भाडेकराराची माहिती देण्यासाठी पोलिस ठाण्यात जाण्याची गरज राहिली नाही.
– अनिल कवडे, नोंदणी महानिरीक्षक, नोंदणी व मुद्रांक विभाग

नोंदणी व मुद्रांक विभागाने ऑनलाइन भाडेकरार नोंदणी करताना त्यातच पोलिस व्हेरिफिकेशनची तरतूद केली आहे. ही बाब स्वागतार्ह आहे. परंतु, ऑनलाइन भाडेकरार नोंदणीनंतर पोलिस व्हेरिफिकेशनची स्वतंत्र पोच मिळत नाही किंवा त्याचा उल्लेख दिसत नाही. त्यामुळे नागरिकांना अडचणी येत आहेत. या त्रुटी दूर कराव्यात.
– सचिन शिंगवी, अध्यक्ष, असोसिएशन ऑफ रियल इस्टेट एजंट, पुणे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा