सावित्रीबाई फूले व राजमाता जिजाऊ यांचा संयुक्त जयंती उत्साहाने साजरी

लोणी काळभोर: स्टेशन कदमवाकवस्ती येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) जनसंपर्क कार्यालय पुर्व हवेली तालुक्यांचे वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फूले व राजमाता जिजाऊ आईसाहेब यांच्या संयुक्त जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मा. जयश्रीताई जाधव ( अध्यक्षा -रिपाइं पुणेजिल्हा महिलाआघाडी) यांनी सावित्रीबाई फूले याच्यां प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच मा. सुजाताताई गायकवाड (सचिव – रिपाइं पुणेजिल्हा महिला आघाडी) यांनी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.

मा. लक्ष्मीताई मोरे (जिल्हा कार्यकारिणी सदस्या – रिपाइं पुणेजिल्हा महिला आघाडी), उपस्थित होत्या.. प्रमुख पदाधिकारी मान्यवर.
आयोजक – मा. रमेश गायकवाड (अध्यक्ष – पुर्व हवेली रिपाइं पुणेजिल्हा), मा. संतोष वजाळे
(उपाध्यक्ष -हवेली तालुका कामगार आघाडी रिपाइं ), मा. सोमनाथ जाधव (युवानेते – हवेली तालुका), मा. दौलतराव वजाळे (सचिव- कदमवाकवस्ती रिपाइं), मा. प्रदीप चव्हाण (सा. कार्यकर्ता रिपाइं), मा. सिध्देश्वर थोरात (नेते – कदमवाकवस्ती रिपाइं), यावेळी संजय तांबे, अरविंद वजाळे, प्रमोद जाधव, अशोक ढेरे, दगडू बडेकर ,वंदना रोकडे, मिराबाई वजाळे चंद्रभागा लोंढे,केशरबाई सरोदे, पाटोळेबाई, संध्या मोरे, सविता शेट्टी, आशा वजाळे असंख्य महिला व पुरूष कार्यकर्ते उपस्थित होते. आलेल्या सर्व महिला व पुरूष पदाधिकारी कार्यकर्त्याचे आभार सिध्देश्वर थोरात यांनी मानले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा