नवी दिल्ली : राफेल नदाल आणि नोव्हाक जोकोविच यांचे स्पेन आणि सर्बिया हे संघ एटीपी कप स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पोहचले आहेत. स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये स्पेनने यजमान ऑस्ट्रोलियावर मात केली. स्पेनने ऑस्ट्रोलियाचा २-९ ने पराभव केला. स्पेनच्या रफाएल नदालने ऑस्ट्रोलियाचा अलेक्स डी मिनाॅरचा ४-६, ७-५ , ६-१ असा पराभव केला तर दुसऱ्या सामन्यात स्पेनच्या रोबर्टो बटिस्टा अगुटने ऑस्ट्रोलियाच्या निक किर्गियोसचा ६-१, ६-४ असा पराभव केला.
दुसरीकडे उपांत्य फेरीत सर्बियाने रशियावर मात करत अंतिम फेरी गाठली. सर्बियाच्या जोकोविचने रशियाच्या डॅनिस मेदवेदेवला ६-१, ५-७, ६-४ असे नमवले तर दुसऱ्या सामन्यात सर्बियाच्या डुसन लाचोविचने करेन खाचानोवच ७-५, ७-६, ७-१ असा पराभव केला.
दरम्यान, आता अंतिम सामन्यात कोण बाजी मारणार यावर अवघ्या क्रिडाविश्वाचे लक्ष लागले आहे.