परवेझ मुशर्रफ यांची फाशीची शिक्षा रद्द

लाहोर : फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेले पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. लाहोरच्या उच्च न्यायालयाने मुशर्रफ यांची फाशीची शिक्षा रद्द केली आहे.
लाहोर उच्च न्यायालयाने, मुशर्रफ यांना दोषी ठरवून शिक्षा ठोठावणाऱ्या विशेष न्यायालयालाच असंवैधानिक म्हटले आहे. त्यामुळे, परवेश मुशर्रफ यांना देण्यात आलेली फाशीची शिक्षाही रद्द करण्यात आली आहे. राष्ट्रपती असताना २००७ मध्ये परवेझ मुशर्रफ यांनी आणीबाणी लागू केली होती. यावरून त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून खटला सुरू होता.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा