गोल पोस्ट गुन्हा गुजरातमधील १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार, धडापासून डोके केले वेगळे

गुजरातमधील १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार, धडापासून डोके केले वेगळे

गुजरात, १८ ऑक्टोबर २०२०: गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातून एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. दांतीवाडा पोलिसांना अल्पवयीन मुलीचा मृतदेह सापडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ वर्षांच्या मुलीवर प्रथम बलात्कार करण्यात आला आणि त्यानंतर तिचा खून करण्यात आला. सध्या पोलिसांनी याप्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. पकडलेला आरोपी हा मुलीचा नातेवाईक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शुक्रवारी अल्पवयीन मुलीला दुचाकीवर घेऊन गेला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर आधी बलात्कार केला आणि त्यानंतर तिची हत्या केली.

बनासकांठा येथील डीसा येथून शुक्रवारी अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली. त्यानंतर शनिवारी दांतीवाडा पोलिसांनी मुलीचा डोके अलग केलेला मृतदेह ताब्यात घेतला. पोलिस अधीक्षकांनी मुलीवर बलात्काराची घटना घडल्याची पुष्टी केली आहे. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.

या घटनेसंदर्भात गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवर लिहिले की, ‘गुजरातमध्ये भारत मातेचा गळा कापला गेला. आम्ही वारंवार असे म्हणत होतो की पंतप्रधान मोदींनी हाथरस प्रकरणाच्या बाबतीत काहीतरी बोलावे पण त्यांनी एक शब्दही बोलला नाही. आता गुजरातच्या दांतीवाड्यात १२ वर्षाच्या निरागस मुलीचा गळा कापला गेला. हा कोणता विकास आहे? येथे कायदा आणि घटनेची लक्तरे तोडली जात आहे’.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

error: Content is protected !!
Exit mobile version