१३ वर्षाच्या मुलाने केला खून, तर अमेरिकेत लहान मुलीचा वर्गातील मैत्रिणीवर क्रश

11
सुरत, ३१ जानेवारी २०२१: सध्या काळ बदलत असून कधी कुठे काय घडेल हे सांगता येणार नाही. कमी वयातच आजच्या लहान मुलांना आपण काय करत आहोत याचे साधे भान ही राहत नाही आणि याला जबाबदार कोण? हा प्रश्न तसाच उभा असल्याचा दिसतो. पण, यामधे आजच्या लहान मुलांनवर होणाऱ्या या परिणामाचे गांभीर्य वेळीच लक्षात घेतली नाही तर मग अश्या घटना वारंवार घडतील.
अमेरिकेच्या  ओक्लाहोमच्या ओवासा येथील रीजोईस ख्रिश्चन प्राथमिक शाळेत एक अजब प्रकार घडला आहे. दुसरीच्या वर्गात शिकणारी क्लोएने वर्गातील मैत्रिणीवर क्रश आसल्याचे सांगितले. यामुळे क्लोएला शाळेतून काढून टाकले. शाळेतील तिच्या प्राचार्यांनी  तिला सांगितले की स्त्रियांनी फक्त पुरूषावरच प्रेम करायचे. हे सगळे बायबल मधे सांगितले आहे.
क्लोएलाच शाळेतून न काढता तिच्या लहान भावाला ही शाळेतून काढून टाकले. तर तिच्या आई डेलनी शेल्टल यांनी देखील या गोष्टीचे समर्थन दर्शवले आहे. मात्र या सगळ्या घटनेमुळे क्लोए आजून घाबरली आहे. तिला आपण काय केले हे आजून ठाऊकच नाहीये.
१३ वर्षाच्या मुलाने केला १२ वर्षाचा मुलाचा खून…..
तर इकडे भारतात एक धक्कादायक घटना गुजरातच्या सुरतमधून समोर आली आहे. सुरत मधे १३ वर्षीय मुलाने १२ वर्षाच्या मुलाची हत्या  केली आहे. १३ वर्षाच्या लहान भावाला १२ वर्षाच्या मुलाने  भांडणात शिवीगाळ केली होती. या रागातुन १३ वर्षीय मुलाने त्या मुलाला दंडुक्याने मारहाण करत त्याची हत्या केली.
पोलिसांनी १२ वर्षाच्या मुलाच्या हत्येचा तपास  केल्यावर ही घटना समोर आली आहे. दरम्यान पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.तर या घटनेनमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव