काळ्या रंगाच्या ग्रॅनाइटनं बनणार नेताजींचा 28 फूट उंच पुतळा, जाणून घ्या कुठून येणार हा दगड आणि कोण कोरणार

नवी दिल्ली, 24 जानेवारी 2022: इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा भव्य पुतळा बसवण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच केलीय. हा पुतळा देशाच्या नेताजींप्रती असलेल्या कृतज्ञतेचं प्रतीक असंल, असं पंतप्रधान म्हणाले होते. विशेष म्हणजे 28 फूट उंच ग्रॅनाइटपासून बनवलेली ही मूर्ती ओडिशातील प्रसिद्ध शिल्पकार अद्वैत गडनायक यांनी बनवलीय. इंडिया गेटवर बांधण्यात आलेल्या छत्रीमध्ये नेताजींचा पुतळा बसवण्यात येणार आहे. इंडिया गेटवरील अमर जवान ज्योती नुकतीच काढून राष्ट्रीय युद्ध स्मारकात विलीन करण्यात आली.

अद्वैत नवी दिल्लीतील राज घाट येथे दांडी मार्चचं शिल्प तयार करण्यासाठी ओळखले जातात. नेताजींचा पुतळा 28 फूट उंच असंल, असं अद्वैत यांनी सांगितलं. हा पुतळा जेट ब्लॅक ग्रॅनाइटमध्ये कोरलेलं असंल. तेलंगणातील खम्मम जिल्ह्यातून हा दगड आणण्यात येणार आहे. राष्ट्रीय पोलीस स्मारकासाठीचा दगड याच ठिकाणाहून आणण्यात आला होता.

जोपर्यंत नेताजींचा पुतळा बनत नाही तोपर्यंत होलोग्राम पुतळा बसवला जाईल

अद्वैत म्हणाले, पंतप्रधानांनी माझ्यावर हे काम सोपवलं याचा मला खूप आनंद आहे. एवढ्या वर्षांनी नेताजींना योग्य तो सन्मान मिळंल असं वाटतं. मला खूप अभिमान आहे की मी ओडिशाचा आहे जिथं नेताजींचा जन्म झाला आणि त्यांचं बालपण गेलं.

याआधीही गडनायकांनी अनेक नामवंत शिल्पं साकारली आहेत. यामध्ये राज घाटावरील राष्ट्रपिता पुतळा, महात्मा गांधींच्या सॉल्ट मार्चचा काळा संगमरवरी पुतळा आणि लंडनमधील पुतळ्यांसह अनेक पुतळ्यांचा समावेश आहे.

ओडिशामध्ये जन्मलेल्या गडनाईक यांनी भुवनेश्वरच्या बीके कॉलेजमधून कलेचं शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी दिल्लीतील कला महाविद्यालयातून पदव्युत्तर शिक्षण घेतलं. गडनाईक हे सध्या नॅशनल म्युझियम ऑफ मॉडर्न आर्टचे संचालक आहेत.

या छत्रीवर पूर्वी जॉर्ज पंचमचा पुतळा होता, तो 1968 पासून रिकामा आहे. आता त्यावर नेताजींचा पुतळा बसवण्यात येणार आहे.
गडनायक यांनी सांगितलं की, नेताजींची व्यक्तिरेखा खूप मजबूत होती. अशा परिस्थितीत त्यांचा पुतळा कठीण दगडापासून म्हणजेच ग्रॅनाइटपासून बनवण्याचा विचार आला. याशिवाय काळ्या रंगाच्या ग्रॅनाइटचा वापर केला जात आहे कारण आपण काळ्या रंगाच्या ऊर्जेचा संबंध महाकाली आणि भगवान कृष्ण या देवतांशी जोडतो. त्यामुळं जेट ब्लॅक ग्रॅनाइटपासून नेताजींचा पुतळा बनवणं हा एक चांगला पर्याय आहे. पीएम मोदींना ते आवडलं याचा आम्हाला आनंद आहे.

पुतळा बनवण्यासाठी गडनायक कर्नाटकातील ग्रॅनाइट कारागिरांसोबत काम करणार आहेत. लवकरच ते बनवण्याचं काम नवी दिल्लीत सुरू होईल. सांस्कृतिक मंत्रालय यासाठी एकूण 25 ते 30 शिल्पकारांची निवड करणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा