सोलापुरात अपघात झालेल्या तीस वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

सोलापूर, २३ एप्रिल २०२४ : दुचाकीने धडक दिल्याने एका ३० वर्षीय तरुणाचा अपघात होऊन उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

फरीद पिरसाब दर्जी, वय ३०, रा.शास्त्री नगर असे उपचारादरम्यान मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. सोलापुरातील सात रस्ता ते शास्त्री नगर असे जात असताना गांधी नगर चौक येथे फरीद याचा २१ एप्रिलला अपघात झाला होता. त्यात त्याच्या डोक्याला जबर मार लागला होता. त्यामुळे त्याला तात्काळ सोलापूर शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर फरीद दर्जी याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आज त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी योग्य ती कार्यवाही करून मृत परिवारास न्याय मिळवून द्यावे अशी मागणी मृत परिवारांच्या नातेवाईकांनी केली आहे.

न्यूज अन कट प्रतिनिधी : सिकंदर नदाफ

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा