पृथ्वीच्या दिशेने येत आहे ५२ फुटी लघुग्रह

वॉशिंग्टन,अमेरिका २८ जुलै २०२३ : ‘नासा’ने म्हटले आहे की पृथ्वीच्या दिशेने ५२ फुटांचा आकार असलेला एक लघुग्रह येत आहे. या लघुग्रहाचे नाव ‘२०२० पीपी १’ असे असून तो ४८ तासांमध्ये पृथ्वीजवळून जाईल. २०१९ पासून २०२३ च्या दरम्यानच्या काळात तो आता पाचव्यांदा पृथ्वीच्या दिशेने येत आहे.

या लघुग्रहाचा वेग ताशी १४.४०० किलोमीटर इतका आहे. मात्र, त्यांचा आकार फार मोठा नसून तो अवघा ५२ फुटांचा आहे. यापूर्वी ९ ऑगस्ट २०१९, ५ ऑगस्ट २०२०, ३ ऑगस्ट २०२१ आणि १ ऑगस्ट २०२२ या दिवशी हा लघुग्रह पृथ्वीजवळून गेला आहे. नासा दरवर्षी या लघुग्रहावर लक्ष ठेवते. यावर्षी तो २९ जुलैला पृथ्वीजवळून जाईल. असे अनेक लघुग्रह वेळोवेळी पृथ्वीजवळून जात असतात.

क्वचित कधीतरी त्यांची पृथ्वीला धडकही होत असते. अशा धडकांमुळे निर्माण झालेली विवरे पृथ्वीवर अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. एका मोठ्या आकाराच्या लघुग्रहांच्या भीषण धडकेनंतर पृथ्वीवरून डायनासोरचे साम्राज्य नष्ट झाले होते. अशा अवकाशीय शिळांचा एक पट्टाच मंगळ आणि गुरू या दोन ग्रहांच्या दरम्यान आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा