बंगळूर, २९ नोव्हेंबर २०२०: मंदिरात देवा नंतर जर कुण्या दुसर्यावर माणसांची श्रद्धा असेल तर ती म्हणजे पुजारी वर, प्रत्येक नविन कार्याची असो वा दुसरे कुठलीही कार्य त्या पुजारी शिवाय शक्य होत नाही. पण, हे धर्माचे रक्षकच जर भक्षक झाले, तर मग काय? पण आशीच मानवतेला कळीमा फासणारी घटना बंगळूर मधे घडली आहे.
बंगळूरट मधील देवाण हल्ली परिसरात ६२ वर्षीय पुजार्यानं १० वर्षीय चिमुरडीवर बलात्कार केला आणि त्याहूनही मोठा कळस म्हणजे त्याने हे कृत्य चिमुरडीच्या घरातच केले. वेंकटरामणप्पा असं आरोपीचे नाव आसून तो मंदिरामधे पुजारीचे कार्य करतो. घडल्या प्रकारानंतर आरोपी स्वताच्या मुलीच्या घरी भेट द्यायला गेल्यानंतर तिथे पोलिसांनी आरोपीवर झडप घालत त्याला ताब्यात घेतलं आहे.
पुजारीच्या या कृत्याने एक वेळ देवाला देखील मानवाची आसणारी हि विकृती पाहून स्वतावर राग आला असेल. निसर्ग निर्मिती जेव्हां झाली तेव्हा सर्वात सुंदर जीव या पृथ्वीतलावर अस्तित्वात असेल तर तो म्हणजे मानव जात पण, काळानुसार मानव प्रगती करतोय खरं पण त्याचा स्वभावातील विकृतीवर तो आजून ही ठाम नाही. ज्यामुळे असे देवाच्या मंदिरात पवित्र काम करणाऱ्या पुजार्याला असे संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी कृत्य करू वाटले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे