नवी दिल्ली, १ फेब्रुवरी २०२१: देशातील कापड उद्योगाच्या निर्मितीस व निर्यातीला गती देण्यासाठी ७ मेगा टेक्सटाईल पार्क बांधली जातील. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केलेल्या अर्थसंकल्पीय भाषणात असे सांगितले की देशात ७ टेक्सटाईल पार्क तयार केली जातील, जेणेकरुन भारत या क्षेत्रात निर्यात करणारा देश होईल. ही टेक्सटाईल पार्क तीन वर्षांत बांधली जातील.
वस्त्रोद्योग मंत्रालयाने ठेवला होता प्रस्ताव वस्त्रोद्योग मंत्रालयाने सात मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रीजन आणि अॅपरेल (एमआयटीआरए) पार्क सुरू करण्याचा प्रस्ताव दिला होता. वस्त्रोद्योगाचा व्यवसाय जवळपास २२ हजार कोटी रुपयांपर्यंत वाढविण्याच्या उद्देश आहे.
आधुनिक सुविधा
इंटीग्रेटेड टेक्स्टाईल पार्क २००५ साली सरकारने सुरू केले होते. आंतरराष्ट्रीय मानकांच्या आधारे, एकाच ठिकाणी सुविधा पुरविल्या जातील जेथे अनेक कारखाने स्थापित केले जातील. मेगा टेक्सटाईल पार्कच्या निर्मितीचा उद्देश असा आहे की देशात एकात्मिक जागतिक स्पर्धात्मकता प्रदान करण्यासाठी एकात्मिक उत्पादन आणि निर्यात केंद्र विकसित केले जातील.
त्याशिवाय तीन वर्षांत ५ लाख कोटी रुपयांचे कर्ज घेणाऱ्या विकास वित्तीय संस्था (डीएफआय) ची स्थापना करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांच्या वतीने करण्यात आली.
रेल्वे, एनएचएआय, विमानतळ प्राधिकरणाकडे आता आपल्या स्तरावर अनेक प्रकल्प पार पाडण्याची शक्ती असेल, अशी घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. अर्थमंत्र्यांनी भांडवली खर्चासाठी ५ लाख कोटींपेक्षा जास्त बजेट जाहीर केले. मागील अर्थसंकल्पाच्या तुलनेत ही घोषणा ३० टक्के जास्त आहे. याशिवाय अतिरिक्त राज्य व स्वतंत्र संस्थांना दोन लाख कोटी रुपये दिले जातील.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे