गोल पोस्ट गुन्हा तोंडात माती कोंबत, गुप्तांगावर लाठीकाठी मारत केला ७० वर्षीय वृध्देवर बलात्कार……मुंबईत ३...

तोंडात माती कोंबत, गुप्तांगावर लाठीकाठी मारत केला ७० वर्षीय वृध्देवर बलात्कार……मुंबईत ३ वर्षीय चिमुरडीवर बलात्कार…..

मुंबई, २२ नोव्हेंबर २०२०: मध्य प्रदेश आणि मुंबई मधे दोन दिवसात दोन बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. ज्या मधे नुकतेच जग पहायला आलेली ३ वर्षाची चिमुरडी तर संपूर्ण आयुष्य जगून मरणाची वाट बघणारी ७० वर्षाच्या वृद्ध महिलेचा समावेश आहे.

पहिली घटना मध्य प्रदेश मधील आहे.मध्य प्रदेशात एका ७० वर्षीय वृध्देवर बलात्कार करून हत्या करण्यात आली. आरोपींनी बलात्कार करत असताना तिच्या तोंडात माती कोंबली होती. तर यावरच न थांबता या राक्षसांनी लाठी कठ्यांनी तिच्या गुप्तांगावर हल्ला केला. ही घटना महिला बुधवारी रात्री शेतातल्या झोपडीत झोपली असताना घडली.

महाराष्ट्राच्या मुंबई मधे महिलांबरोबरच लहान चिमुरडी देखील असुरक्षित आहेत. मुंबईत केवळ ३ वर्षीय चिमुरडीवर २ अल्पवयीन नराधमांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी मुंबईच्या कस्तुरबा मार्ग पोलीस स्थानकात पाॅक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आसून त्या २ नरधमांना बालसुधारगृहात टाकण्यात आले आहे. ही माहिती कस्तुरबा मार्ग पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी दिली आसून या धक्कादायक घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

error: Content is protected !!
Exit mobile version