मधाच्या शोधात उंच टाकीवर चढले अस्वल!

पुणे, १२ ऑक्टोबर २०२२: अनेक प्राणी अनेकदा विचित्र गोष्टी करताना आढळतात. कधी कधी त्याच्या या कृती कॅमेऱ्यात कैद होतात, तर काही सोशल मीडियावर खूप व्हायरल होतात. आजकाल दोन अस्वलांचा असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.. हे अस्वल पाहून तुम्हाला मोगलीचा बल्लू आठवेल. जरी अस्वल धोकादायक प्राण्यांच्या श्रेणीत गणले गेले असले तरी त्यांच्या कृती इतर धोकादायक प्राण्यांपेक्षा पूर्णपणे अद्वितीय आहेत. जाणून घेऊयात काय खास आहे व्हिडिओमध्ये….

अस्वलांवर मधमाश्यांचा हल्ला !

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये दोन अस्वल त्यांच्या आवडीचे अन्न खाण्यासाठी न घाबरता पाण्याच्या टाकीवर चढतात. जिथे टाकीच्या वर मधमाशांचे मोठे पोळे आहे. एक अस्वल मध काढण्यासाठी मधमाशीच्या पोळ्यात हात घालतो. आपल्या घरावर अस्वलाचा हल्ला पाहून माशा उलटे अस्वलावर हल्ला करतात, पण अत्यंत बेफिकीर अस्वलाला मध चाखण्यात आनंद होत आहे.

हा व्हिडिओ भारतीय वन सेवा (IFS) अधिकारी सुसंता नंदा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट करताच याने युजरचे लक्ष वेधून घेतले आहे. हा व्हिडिओ एक दिवसापूर्वी पोस्ट करण्यात आला आहे. शेअर केल्यापासून, व्हिडिओला जवळपास सत्तावीस हजार लोकांनी पाहिला असून या पोस्ट वर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत

मधाचं वेड लावणाऱ्या या अस्वलांचा व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्स खूप खुश होत आहेत. या १ मिनिट १२ सेकंदाच्या व्हिडिओमध्ये दोन अस्वल स्पष्टपणे दिसत आहेत. व्हिडिओ पाहून एका यूजरने लिहिले- काय भाऊ… बल्लू चव समजली का ? त्याचवेळी आणखी एका यूजरने लिहिले की, आता या अस्वलाचे काही खरे नाही. याशिवाय, एका यूजरने व्हिडिओच्या निर्मात्याला असा सल्लाही दिला की, ही कृती त्याच्यासाठी धोकादायक ठरू शकते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा