इंग्लंड विरुद्ध सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का

पुणे, २८ ऑक्टोबर २०२२ : आज ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात गट- अ सामना होणार आहे. या सामन्यापूर्वी यजमान ऑस्ट्रेलियाला खूप मोठा धक्का बसला आहे. संघाचा यष्टीरक्षक फलंदाज मॅथ्यू वेड हा कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे.

दरम्यान आजच्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया संघाकडे कोणताही बॅकअप यष्टीरक्षक फलंदाज नसल्याने ऑस्ट्रेलियाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. मॅथ्यू वेड हा ऑस्ट्रेलियाचा खतरनाक फलंदाज आहे. त्याने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे या विश्वचषकात चांगली कामगिरी करेल अशी चाहत्यांना आशा होती.

आयसीसीच्या नवीन नियमानुसार. जर एखादा खेळाडू कोविड पॉझिटिव्ह आला. तरीही तो सामन्यात खेळू शकतो. यापूर्वी कोरोनाबाधित खेळाडूंना विलगीकरणात ठेवलं जायचं जेव्हा खेळाडू पूर्णपणे बरा व्हायचा तेव्हा त्याला खेळण्याची परवानगी दिली जायची. त्यामुळे वेड कोरोना पॉझिटिव्ह असूनही सामना खेळू शकतो. पण त्यासाठी संघाच्या वैद्यकीय तज्ञांकडून क्लीन चिट मिळवणं खूप गरजेचे आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा