मोदी सरकारमध्ये मोठा फेरबदल ! रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरुन हटवले, अर्जून राम मेघवाल नवे कायदामंत्री

8

नवी दिल्ली, १८ मे २०२३: मोदी सरकारमध्ये आज मोठा फेरबदल झाला. किरण रिजिजूं यांना मंत्रिपदावरून हटविण्यात आले आहे. त्यांच्या जागी अर्जून राम मेघवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारने कायदा मंत्री किरण रिजिजूं यांचे मंत्रालय बदलले आहे. अर्जून राम मेघवाल आता रिजिजूं यांच्या जागी कायदा मंत्री असतील. तर किरण रिजिजूं यांच्याकडे पृथ्वी आणि विज्ञान मंत्र्यालयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

किरण रिजिजूं हे वर्तमान आणि निवृत्त न्यायमूर्ती बद्दलच्या टिप्पणीमुळे चर्चेत आले होते. देशात कोणीही कोणाला इशारा देऊ शकत नाही. असेही त्यांनी कॉलेजियमबद्दल म्हटले होते. त्यांचे या विधानावर विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली होती. अर्जून राम मेघवाल हे मुळचे राजस्थानमधील बिकानेरचे. त्यांनी जिल्हा उद्योग केंद्रात सहाय्यक संचालक म्हणून काम केले आहे.

२०२१ मध्ये रिजिजूं यांना कायदा मंत्री करण्यात आले होते. रिजिजूं हे वर्तमान आणि निवृत्त न्यायमूर्ती बद्दलच्या टिप्पणीमुळे चर्चेत आले होते. देशात कोणीही कोणाला इशारा देऊ शकत नाही. असं ते म्हणाले होते. देशातील प्रत्येकजण संविधानानुसार काम करतो. निवृत्त न्यायाधीशांबाबतही त्यांनी वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते की, काही निवृत्त न्यायाधीश भारतविरोधी गटाचा भाग बनले आहे. या कारणांमुळे त्यांना मंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर