गोल पोस्ट राजकारण माझ्यावरील हल्ल्यामागे मोठी ताकद : आमदार प्रज्ञा सातव यांचा गंभीर आरोप

माझ्यावरील हल्ल्यामागे मोठी ताकद : आमदार प्रज्ञा सातव यांचा गंभीर आरोप

हिंगोली, ९ फुब्रेवारी २०२३ : माझ्यावरील हल्ल्यामागे मोठी ताकद असू शकते, असा गंभीर आरोप काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव यांनी केला आहे. त्यांच्यावर बुधवारी रात्री हिंगोली येथे हल्ला झाला होता. या घटनेबाबत बोलताना प्रज्ञा सातव म्हणाल्या, की माझ्यावरील हल्ल्यामागील कारण संशयास्पद आहे. हल्लेखोराशी माझे कोणतेही वैमनस्य नव्हते.

त्याला मी ओळखतही नाही. त्याने माझ्यावर हल्ला करण्याचे कोणतेही कारण नव्हते. त्यामुळे या हल्ल्यामागे एका मोठी शक्ती असू शकते. हल्लेखोराच्या पाठीमागे कोण आहे? हे समोर येईपर्यंत आमचे समाधान होऊ शकत नाही. आपण स्वतःहून हल्ला केला नाही. मला हल्ला करायला कोणीतरी सांगितले, अशी कबुली हल्लेखोराने पोलिसांना चौकशीत दिली आहे.

हिंगोली जिल्ह्यात आम्ही पक्षाचे काम पूर्ण ताकदीने करीत आहोत. गावागावांत फिरून नागरिकांशी संवाद साधत आहोत. नागरिकांचाही आम्हाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे मला घाबरवून घरी बसविण्याचा प्रयत्न असू शकतो. मात्र, घाबरून घरी बसणाऱ्यांमधील मी नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version