एक मोठी बातमी; पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक

पाकिस्तान, ९ मे २०२३ : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांना अटक करण्यात आली आहे. इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या बाहेरून त्यांना रेंजर्सनी ताब्यात घेतले आहे. ‘अल कादिर ट्रस्ट भष्टाचार’ प्रकरणी पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

आज दुपारी दोन सुनावणीसाठी इस्लामाबाद उच्च न्यायालयासमोर हजर राहण्यासाठी इम्रान खान आले होते. त्यांना न्यायालयाच्या परिसरातच रेंजर्सनी ताब्यात घेतले, इम्रान खानचे वकील फैसल चौधरी यांनी सांगितले आहे. न्यायालयात या आणि आम्हाला सांगा की इम्रान खान यांना कोणत्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे, अशी विचारणा इस्लामाबाद न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश फारुक यांनी केली आहे.

या घटनेनंतर पीटीआयचे अझहर मशवानी यांनी इम्रान यांचे रेंजर्सनी कोर्टाच्या आतून अपहरण केले असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान या प्रकरणी देशभरात निदर्शने करण्याचे पक्षाने तत्काळ आवाहन केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा