गोल पोस्ट इतर राहुल गांधींच्या यात्रेत भाजप समर्थकानं स्वतःला घेतलं पेटवून

राहुल गांधींच्या यात्रेत भाजप समर्थकानं स्वतःला घेतलं पेटवून

राजस्थान, ९ डिसेंबर २०२२: राजस्थानमध्ये भारत जोडो यात्रेच्या चौथ्या दिवशी भाजप समर्थकानं स्वतःला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यानं गणवेश उतरवून त्याचे प्राण वाचवले. काँग्रेसच्या धोरणांबद्दल तरुणांमध्ये नाराजी होती. तर, यात्रेच्या मार्गावर शेतकऱ्यांनी लसूण फेकून घोषणाबाजी केली.

शासनाच्या दुर्लक्षामुळं पिकाला योग्य दर मिळत नसल्याची भारतीय किसान संघाची तक्रार होती. राहुल गांधींच्या आजच्या प्रवासाला ब्रेक लागणार आहे. उद्या राहुल यांच्यासोबत फक्त महिला पादचारी चालतील. यात सोनिया गांधीही सहभागी होण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील महिलांसाठीही एक दिवस ठेवण्यात आला होता.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

error: Content is protected !!
Exit mobile version