मुंबई, ७ ऑगस्ट २०२०: चित्रपट सृष्टीमधील अनेक अभिनेत्रीनीं आज एक विशेष असे स्वत:चे एक स्थान निर्माण केले आहे. पण, त्यांच्या कारकीर्दीत त्यांना कास्टिंग काउचा देखील सामना करावा लागला असतो. नेहमीच चित्रपट सृष्टीचं हे एक काळं सत्य अनेक वेळा देशासमोर आले आहे. या प्रकरणात अनेक अभिनेत्रींनी जाहीरपणे कबुली दिली आहे आणि त्यांनी आपले अनुभवही सांगितलेले आहेत.
आज आपण अशाच अभिनेत्रींचे अनुभव वाचणार आहोत.
शार्लिन चोपडा़
एक हाॅट आभिनेत्री म्हणून ओळख असलेली शार्लिन हिला या कास्टींग काऊचा सामना करावा लागला आहे. या बद्दल अनुभव सांगताना तिने कास्टींग काऊचला तिच्या समोर एका वेगळ्या भाषेत वापर केल्याचे सांगितले. डिनर असे त्याला बोलले जाते. शार्लिनला अनेक जण डिनरला ये असे बोलायचे आणि जेव्हा ती विचारायची किती वाजता येऊ तर ते तिला उशीरा रात्री ११ /१२ ची वेळ सांगायचे हा प्रकार शार्लिनच्या हळू हळू लक्षात येऊ लागला. त्यानंतर तिनेच यावर एक शक्कल लढवत पर्याय काढला कोणी विचारले तिला डिनरचे तर ती त्यांना बोलते, मला डिनर आवडत नाही हवं तर सकाळी ब्रेकफास्ट किंवा दुपारी लंचला येते. असा अनुभव शार्लिनने शेयर केला.
सुरवीन चावला
सुरवीन चावला एक अतिशय सुंदर अभिनेत्री आहे. अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केल्यानंतर तिने चित्रपटसृष्टीत काम करायला सुरूवात केली . तिलाही दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत कास्टिंग काऊच मधून जावे लागले होते, परंतू तिच्या म्हणण्यानुसार तिने तडजोड करण्यास नकार दिला. मात्र, बॉलिवूडमध्ये यापूर्वी कधीही अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागला नाही असे सुरवीनने कबूल केले आहे.
राधिका आपटे
राधिका आपटेला चित्रपट सृष्टीत आज घडीला कुठल्याही परिचयाची गरज नाही. तिने दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतही तिचा ठसा उमटवला असून हिंदी चित्रपटांशिवाय तमिळ, बंगाली, तेलगू आणि मल्याळम चित्रपटांमध्येही काम केले आहे.
२०१८ मध्ये ती अक्षय कुमारच्या लोकप्रिय चित्रपट पॅडमॅनमध्येही दिसली होती. राधिका आपटेला दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील कास्टिंग काउचचा त्रास झाला आहे. तिला एका अभिनेत्याने बॉलिवूड चित्रपटाची ऑफर दिली होती, पण त्यासाठी तिला तडजोड करण्यास संगितले होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी