गोल पोस्ट आंतरराष्ट्रीय पाकिस्तानात ग्वादर शहरात भीषण बॉम्ब स्फोटात चीनच्या ६ अभियंत्यांचा मृत्यू

पाकिस्तानात ग्वादर शहरात भीषण बॉम्ब स्फोटात चीनच्या ६ अभियंत्यांचा मृत्यू

ग्वादर, २१ ऑगस्ट २०२१: पाकिस्तानात भीषण बॉम्ब स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. पाकिस्तानच्या ग्वादर शहरात झालेल्या या स्फोटात चीनच्या ८ अभियंत्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय.  बॉम्ब स्फोट बलोच फायटर यांनी घडवून आणल्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. आत्तापर्यंत कोणत्याही संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. मात्र  हल्ल्यामागे अफगाणिस्तानवर कब्जा केलेल्या तालिबान्यांच्या हात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय.
याआधी पाकिस्तानच्या उत्तर-पश्चिम भागात बसमध्ये झालेल्या स्फोटात 9 चिनी अभियंते ठार झाले होते. आणि आता पुन्हा पाकिस्तानात चीनी अभियंत्यांना लक्ष्य करत झालेला हा दुसरा मोठा बॉम्ब हल्ला आहे.  पाकिस्तानने बसमध्ये झालेल्या स्फोटाला तांत्रिक बिघाडाचं कारण देत झालेली दुर्घटना सांगितलं होतं. या दहशतवादी हल्ल्यामुळे चिनी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
सिंध प्रांतातही हल्ला
अफगाणिस्तानात दहशत निर्माण करण्यासाठी पाकिस्तान सातत्याने तालिबान्यांची मदत घेत आला आहे. त्याचा परिणाम आता दिसून येत आहे. गुरुवारी सिंध प्रांतातील बहावन नगरमध्ये शिया समुदायाच्या एका मिरवणुकीवर हल्ला झाला होता. या हल्ल्यात ५ लोक मारले गेले. तर ४० लोक जखमी झाले होते. या हल्ल्यानंतर परिसरात एकच पळापळ सुरु झाली आणि त्याचा फायदा घेत हल्लेखोर तिथून पसार झाले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे
error: Content is protected !!
Exit mobile version