कल्याण, दि. २ ऑगस्ट २०२०: कोरोना आणि लॉकडाउनचा फटका हा प्रत्येकाला बसला आहे .अनेकांच्या नोकऱ्या गेल्या अनेकांचे रोजगार गेले . शाळा, महाविद्यालये बंद पडली आहेत आणि हातावर पोट असणाऱ्यांच्या पोटाला चिमटे बसण्याची वेळ आली आहे. याच परिस्थितीवर परखडपणे टिका करणारं, खरी परिस्थिती समाजासमोर मांडणारं एक रॅपसॉंग कल्याणचा रॅप सिंगर रवी सिंगने यांने बनवलं आहे.
या गाण्यात त्याने नागरिकांना होणारा त्रास, केडीएमसीतील खरी परिस्थिती त्या ठिकाणंवर जाऊन मांडली आहे. या गाण्यात त्यांने कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेचा भोंगळ कारभार जनतेसमोर आणला आहे. तर दुसरीकडे राजकीय नेते, पुढारी यांची देखील शाळा घेतली आहे. गेल्यावर्षी कल्याणच्या याच गल्लीबॉयने ‘पत्रीपुल कब बनेगा’ या आशयाचे रॅप सॉंग बनवले होते. मात्र अद्यापही हा पत्रीपुल काही पुर्ण झाला नाही .
त्याच्या या रॅपसॉंगला चाहत्यांनी चांगलचं डोक्यावर घेतल आहे. अवघ्या एक दिवसांतच हा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामुळे आता तरी केडीएमसीने आपली गती वाढवून जनतेच्या हिताची काम करावी असे म्हटले जात आहे.
न्यूज अनकट प्रतिनीधी : राजश्री वाघमारे