दुबईमधील शारजाह शहरातील इमारतीला भीषण आग

दुबई, दि. ६ मे २०२०: युएईच्या शारजाह शहरात एका बहुमजली इमारतीला आग लागली आहे. वृत्तसंस्था एएनआय च्या वृत्तानुसार ही घटना अल नहदा भागात घडली. ताज्या माहितीनुसार शारजाह सिव्हिल डिफेन्सची टीम आगीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे.

स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार मंगळवारी संध्याकाळी उशिरा या इमारतीत आग लागली. आगीच्या लोळांमध्ये संपूर्ण परिसर उजळून निघाला होता. युएईच्या स्थानिक माध्यमांचे म्हणणे आहे की या इमारतीत अडकलेल्या सर्व लोकांना सिव्हिल डिफेन्सच्या टीमने बाहेर काढले आहे, परंतू आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आग विझविण्यासाठी हायड्रॉलिक फायर मशीन बसविण्यात आल्या आहेत. ताज्या माहितीपर्यंत आग विझविण्यात आली असून या घटनेत कुणाचा मृत्यू झालेला नाही.

आग विझविण्याचे काम अद्याप सुरू आहे. येथे आग कशामुळे लागली हे कळू शकले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, इमारतीत राहणाऱ्या सर्व लोकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. शारजाह हे संयुक्त अरब अमिरातीमधील तिसरे सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर आहे. मोठ्या संख्येने परदेशी भारतीयही या शहरात राहतात.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा