लग्नाच्या अमिषाने महिलेवर बलात्कार युवकासह त्याच्या आई-वडीलांवर गुन्हा दाखल

बारामती,२६ सप्टेंबर २०२० : लग्नाच्या अमिषाने नऊ महिने महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी मळद येथील एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात त्याला सहाय्य केल्याप्रकरणी त्याची आई व वडील यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत येथील ३१ वर्षीय महिलेने फिर्याद दाखल केली. रणजित मोहन मदने, नंदा मोहन मदने व मोहन मदने (सर्व रा. मळद, ता. बारामती) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. २० जानेवारी ते २५ सप्टेंबर या कालावधीत महिलेच्या बारामती येथील घरी व त्यानंतर रणजित मदने याच्या मळद येथील घरी हा प्रकार घडला.

रणजित याने महिलेला लग्नाचे अमिष दाखवत मित्र राहत असलेल्या भाडोत्री खोलीवर, सातारा, जेजुरी तसेच बारामतीतील मोरगाव रस्त्यावरील एका लाॅजवर नेत तिच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी शारिरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर जळगाव कडेपठार येथील महादेव मंदिरात तिला नेत तिच्या गळ्यात हार, मंगळसूत्र घालत लग्न केले असल्याचे भासवले. आपण नंतर नोंदणी पद्धतीने विवाह करू, असे आश्वासन त्याने दिले होते. परंतु त्याच्याकडून वारंवार फोनवर अश्लील शिविगाळ करून मानसिक त्रास देण्यासह मारहाण करण्यात आली.
२० जानेवारी रोजी नंदा व मोहन यांनी फिर्यादीला राहत्या घरात डांबून ठेवले होते. त्यानंतर तुझे रणजितशी लग्न करून देतो असे सांगत तिला मळद येथील राहत्या घरी बोलावून ठेवत तिला ठकवण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल यादव