तृतीय पंथीय व्यक्तीकडून निलेश राणेंच्या विरोधात गुन्हा दाखल

मुंबई, दि.२१मे २०२०: सध्या निलेश राणे यांचे ट्विट वॉर चांगलेच गाजत आहे. त्यातच त्यांनी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर टीका करताना त्यांचा उल्लेख ‘हिजडा’ असा केला होता. त्यामुळे तृतीयपंथी समुदायामध्ये संताप पसरला आहे. त्याच अनुषंगाने एका तृतीय पंथीय व्यक्ती शमीभा पाटील यांनी निलेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

भारतीय दंड संहितेच्या कलम ४९९ व ५०१ अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सध्या निलेश राणे व आमदार रोहित पवार यांच्यात गेल्या काही दिवसांपासून ट्विट युद्ध रंगले आहे. रोहित पवार यांच्यावर राणे यांनी केलेल्या टीकेवर नाराजी व्यक्त करणारे ट्विट राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले होते. तनपुरे यांच्या या ट्विटमुळे राणे चांगलेच भडकल्याने त्यांनी आपली पातळी सोडत
तनपुरे यांच्यावर खालच्या शब्दांत टीका केली. त्यात त्यांनी तृतीयपंथीयांचाही उल्लेख केला. राणे यांच्या या ट्विटला प्रत्युत्तर देत सारंग पुणेकर या तृतीयपंथी व्यक्तीने बुधवारी संताप व्यक्त केला होता.

‘हिजडा’ या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहीत नसेल तर मी सांगते. हे वक्तव्य मागे घ्या, नाहीतर तुमचा बाजार उठवेन अशी तंबी सारंग पुणेकर यांनी दिली होती. त्यानंतर जळगाव येथील पाटील या व्यक्तीने निलेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

त्यामुळे निलेश राणे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा