शरद पवारांवर केलेल्या टीकेमुळे बारामतीमध्ये पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल

7

बारामती, दि. २५ जून २०२० : बारामती शहरात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केल्याने राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते संतप्त झाले आहेत शहरातील चौकात गोपीचंद पडळकर यांचा निषेध व्यक्त करत पुतळा जाळण्यात आला आज गुरुवारी दि २५ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक अध्यक्ष अमर धुमाळ यांनी पडळकर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

बारामती शहरात नुकत्याच विधान परिषदेवर वर्णी लागलेले भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना बोलले की, शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे. तसेच त्यांची बहुजनांवर अत्याचार करण्याची त्यांची नेहमीच भूमिका राहिली आहे. असे खोचक विधान केल्याने राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पडळकर यांचा निषेध व्यक्त करत बारामती शहरातील भिगवण चौकात पुतळा जाळला तसेच राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष अमर धुमाळ यांनी शरद पवार यांची कोरोना सारख्या महामारीशी तुलना केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्ते व तमाम बारामती व समाजात तेढ निर्माण होऊ शकते तरी गोपीचंद पडळकर यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी फिर्याद अमर धुमाळ यांनी बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे.

पडळकर यांच्या विरोधात भा द वि कलाम ५०५ (२) कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, बारामती नगर पालिकेचे गटनेते सचिन सातव, बारामती युवक अध्यक्ष अमर धुमाळ, महिला अध्यक्ष अनिताताई गायकवाड इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा