दौंडमध्ये गुन्हेगारांना आवर घालण्याचे पोलिसांपुढे आव्हान

दौंड (जि. पुणे), १९ डिसेंबर २०२२ : दौंड शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. आता पोलिसांनी दहशत निर्माण करणाऱ्या माफियांवर कारवाई करण्यास सुरवात केली आहे.

दौंड शहरातील वडार गल्ली येथील चंद्रकांत विष्णू धोतरे या युवकास तब्बल नऊ जणांनी ठार मारण्याची धमकी दिली. तक्रारदार स्वतःच्या घराजवळ थांबला असता, विजू देवकर नावाच्या व्यक्तीने रस्त्यात आडवून तू दौंड पोलिस स्टेशन येथे आमच्याविरुद्ध दाखल केलेला गुन्हा मागे घे, नाही तर आम्ही तुला ठार मारू, अशी धमकी देऊन शिवीगाळ, दमदाटी करून ठार मारण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळी तेजस देवकर व संतोष देवकर हेही त्यांच्याकडे असलेले कोयते घेऊन अंगावर धावून आले; तसेच बबलू देवकर व अमोल देवकर यांच्याकडे लोखंडी नळाचे पाईप होते. ते तक्रारदार याच्या अंगावर धावून गेले असता, त्यांनी तेथून पळ काढला व दौंड पोलिस ठाण्यात येऊन याबाबत तक्रार दिली. दौंड पोलिसांनी आरोपी विजू देवकर, संतोष देवकर, अशोक देवकर, अमोल देवकर, मोहन देवकर, राजू देवकर, सोन्या देवकर, बबलू देवकर, प्रदीप देवकर (सर्व रा. वडार गल्ली, ता. दौंड, जि. पुणे) यांच्यावर दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.स.ई. आबनावे करीत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी : नीलेश कांबळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा