जसप्रीत बुमराहच्या जागी भारताच्या टी-ट्वेंटी संघात या गोलंदाजाला संधी

मुंबई, १ ऑक्टोबर २०२२ : भारताचा घातक गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे टी ट्वेंटी वर्ल्डकप मधून बाहेर झाला आहे. यामुळे टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. बुमराह दुखापतीमुळे सुरू असलेल्या दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या टी-ट्वेंटी मालिकेतून बाहेर झालाय. पाठीच्या दुखापतीमुळे तो पहिल्या सामन्यात ही खेळला नाही. शुक्रवारी (३० सप्टेंबर) भारताच्या संघ निवड अधिकाऱ्यांनी त्याच्या जागी एक वेगवान गोलंदाजाला संघात घेतले आहे. तो उर्वरित दोन सामन्यासाठी संघाशी जोडला जाणार आहे.

बीसीसीआयने दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्मद सिराजला संधी दिलीय. बीसीसीआयने आपल्या विधानात म्हटले, सिलेक्टर्सने मोहम्मद सिराज ला दक्षिण आफ्रिका विरुद्ध ‘टी ट्वेंटी’ मालिकेसाठी दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराहच्या जागी संघात सामील केले आहे.

जसप्रीत बुमराहच्या पाठीला दुखापत झाली असून तो सध्या बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे. भारताने बुधवारी पहिला टी ट्वेंटी सामना जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

दरम्यान जसप्रीत बुमरा हा पाठीच्या दुखापतीमुळे विश्वचषकच काय तर पुढचे पाच ते सहा आठवडे खेळू शकणार नाही, अशी प्राथमिक माहीती समोर येत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा