मुंबई, १२ नोव्हेंबर २०२२ : मुंबईमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका आईने आपल्या एक दिवसाच्या बाळाला एक लाख रुपयात विकल्याचे . या प्रकरणात बाळ विकत घेणाऱ्या नर्सला आणि आईला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांकडून दोघींचीही चौकशी सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बाळ खरेदी करणारी महिला ही नर्स आहे. तर बाळाला जन्म देणारी आई कोणतेही काम करत नाही. बाळाला जन्म दिल्यानंतर लगेचच विकण्याची ती माहिती मिळवत होती, या दरम्यान तिचा या नर्सशी संपर्क आला. बाळ जन्माला आल्यानंतर विकत घेण्याची तिने तयारी दाखवली. यानंतर बाळाला जन्म दिल्यावर दुसऱ्याच दिवशी तिने एक लाख रुपयात विकत घेतले. या दोघी संपर्कात आल्यानंतर नर्स देखील बाळाला पुढचे ग्राहक शोधत होती. ही माहिती मुंबईच्या गुन्हे शाखेला मिळाली.
ही माहिती मिळाल्यावर गुन्हे शाखेच्या पथकाने पाळत ठेवून सापळा लावला. आणि नर्स आणि आईला ताब्यात घेतले. दोघींवरही कलम ३७०(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघींना अटक करण्यात आले आहे. त्यांनी या प्रकारे हा पहिलाच गुन्हा केला आहे का इतरही मुलांची विक्री करणाऱ्या काही रॅकेट चालवत आहेत. याचा पोलसंकडून कसून तपास सुरू आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर