गोल पोस्ट महाराष्ट्र मुंबई मुंबईमधील साकीनाका येथील गोदामाला लागलेली आग आटोक्यात

मुंबईमधील साकीनाका येथील गोदामाला लागलेली आग आटोक्यात

मुंबई, २५ ऑक्टोबर २०२२: मुंबईतील साकीनाका येथील खैरानी रोड या ठिकाणी असलेल्या गोदामाला आज सकाळी भीषण आग लागली होती. साकीनाका येथील वारदान गल्लीमध्ये ही भीषण आग लागली होती. या आगीची स्थानिक नागरिकांना माहिती मिळताच, ताबडतोप त्यांनी अग्निशामक दलाला सांगितले.

या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि युद्ध पातळीवर आग विझवण्याचे काम सूरु केले होते. मोठ्या प्रयत्ना नंतर आग विझवण्यात अग्निशामक दलाला यश आले होते. मात्र आगीचे कारण अजून समजू शकलेले नाही.

ही भीषण आग लागल्यानंतर या संपूर्ण परिसरात धुराचे लोट चे लोट पसरले होते. आता ही आग पुर्णपणे अटोक्यात आली आहे‌ अशी माहीती अग्निशामक दलाच्या अधिकारीने सांगितले आहे. आता या ठिकाणी कुलिंग करण्याचे काम सुरु आहे.

या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मात्र गोदामातील सर्व साहित्य पुर्णपणे जळून खाक झाले आहे. अशी माहीती पोलिसांनी दिली.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version