कल्याण पश्चिममध्ये खडकपाडा भागातील इमारतीला आग, प्रसंगावधान राखून नागरिकांनी वाचवला स्वतःचा जीव

13

कल्याण, ३ ऑक्टोबर २०२२ : मुंबई पुण्या सारख्या शहरांमध्ये वरचेवर आगीच्या दुर्घटना घडताणा दिसून येतात. त्यातही उंच इमारतींमध्ये आग लग्नाची दुर्घटना झाल्यास बचाव कार्यासाठी त्रेधातिरपीट उडत असते. अशीच कल्याणमध्ये एका इमारतीला आग लागली होती. यावेळी आगीपासून बचाव करण्यासाठी चक्क साडीचा उपयोग करण्यात आला. या भयावर घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

कल्याण पश्चिम मधील खडकपाडा भागातील मोहन अल्टीजा या इमारतीला आग लागली होती. या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील भागात आग लागली होती. आग लागल्यामुळे इमारतीमधील रहिवाश्यांमध्ये एकच खळबळ उडाली. घटनेचे गांभीर्य ओळखून रहिवाशांनी तातडीने याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना दिली. अग्निशमन दलाच्या यंत्रणेने विनाविलंब घटनास्थळी धाव घेतली.

इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागल्यामुळे येथील फ्लॅटधारक रहिवाशांनी आपला बचाव करण्यासाठी बाल्कनीतून दुसऱ्या फ्लॅटमध्ये साडीच्या सहाय्याने जाऊन आपला जीव वाचवला. बाल्कनीमधून साडीच्या सहाय्याने एक एक करून बाहेर पडले. यामध्ये महिला आणि लहान मुलांना सुद्धा एकमेकांच्या मदतीने खाली उतरवण्यात आले. ही संपूर्ण घटना मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

दरम्यान अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणण्यात आली. परंतु तोपर्यंत रहिवाशांनी मोठ्या धाडसाने आपला जीव वाचवला. अग्निशमन दलाच्या जवानांनी काही तासांमध्ये आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीमध्ये दोन ते तीन फ्लॅट आगीच्या विळख्यात सापडले होते. आगीमध्ये इमारतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा