घरगुती वादातून चार महिन्याच्या मुलीला सोडले निर्जन जागी

9

पुणे: जन्मदात्यांनी एका चिमुकलीला रोड वर सोडून गेल्याची घटना कोथरूड येथे घडली आहे. कोथरूड येथील चांदणी चौकात चार महिन्यांची चिमुकली आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आणि नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती, या मुलीच्या आई, वडिलांचा शोध पोलिसांकडून सुरू केला गेला होता.

चांदणी चौकात असलेला पाण्याची टाकी परिसर निर्जन आहे. या भागामध्ये जास्तकरून रहदारी नसते. ह्या बाजूला सहसा कोणी जात नाही. काल गुरुवारी जेव्हा काही व्यक्ती त्या भागांमध्ये गेले होते तेव्हा त्यांना लहान बाळाचा रडण्याचा आवाज येत होता. ते आवाजाच्या दिशेने शोध घेत गेले असता त्यांना तिथे ४ महिन्याची मुलगी आढळून आली.

त्या व्यक्तींनी आजूबाजूला तिचे आई-वडील शोधण्याचा प्रयत्न केला परंतु आजूबाजूला कोणीच नाही आढळल्याने त्यांनी कोथरुड पोलिस चौकीमध्ये सदर घटनेची तक्रार दिली. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन या मुलीला ताब्यात घेतले. पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरात चौकशी केली. बाळ सापडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली यामुळे येथे नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

रात्री उशिरा या मुलीच्या कुटुंबीयांना शोधण्यात यश आले. बिपीन आवटे यांच्या प्रयत्नातून सदर मुलीच्या काकांशी संपर्क होऊ शकला हे कुटुंब आंबेगाव मध्ये राहते घरगुती वादा मुळे मुलीला सोडून दिले होते नातेवाईकांची ओळख पटली असून मुलगी त्यांच्या ताब्यात देण्यात आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी