मुंबई, १ ऑक्टोबर २०२२: ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता नव्या दरानूसार व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात ३२.५० रुपायांची कपात करण्यात आली आहे. मात्र, घरगुती एलपीजी सिलेंडर वर ग्राहकांना कोणताही दिलासा मिळालेला नाही.
आजपासून ऐकोनीस किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत कमी झाली असून. मुंबईमध्ये ३२.५० रुपये, दिल्लीमध्ये २५.५० रुपये, कोलकत्तामध्ये ३६.५० रुपये तर चेन्नईमध्ये ३५.५० रुपयांनी कमी झाले आहेत. यामुळे आता मुंबईमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचा दर १८११.५० रुपये किंमतीला मिळणार आहे.
दरम्यान, महिन्याच्या सुरुवातीलाच नैसर्गिक वायूच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. जागतिक बाजारात शुक्रवारी नैसर्गिक वायूच्या किंमती ४० टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे वीजनिर्मिती, खतनिर्मिंती आणि वाहने चालविण्यासाठी वापरण्यास येणारा गॅस महाग होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
वायू क्षेत्रातून तयार होणाऱ्या गॅससाठी द्यावा लागणारा दर ८.५७ प्रति दशलक्ष डॉलर पर्यंत वाढवण्यात आला आहे. हा दर आधी ६.१ प्रति दशलक्ष डॉलर होता. म्हणून तर घरगुती एलपीजी सिलेंडर स्वस्त किंवा महागही झाला नाही. जो पहीला दर होता तोच आजही आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर