भाविकांच्या टेम्पोचा मोठा अपघात; पंचवीस जण जखमी

नांदेड, २ ऑक्टोबर २०२२: नवस फेडायला जात असताना भाविकांचा टेम्पो पलटी झाल्यांने अपघात झाला आहे. हा अपघात नांदेडच्या किनवट तालुक्यातील शिवणीजवळ झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हदगाव तालूक्यातील हस्तरा येथील भविक तेलंगणातील आडेला देवीचा नवस फेडायला टेम्पोतून जात होते.

दरम्यान शिवणी गावाजवळ आल्यावर टेम्पो चालकाचा गाडीवरचा ताबा सुटल्याने एका वळणावर ताबा सुटला आणि टेम्पो पलटी झाला. टेम्पोतील पंचवीस भाविक जखमी झाले आहेत.

अपघात झाल्याचे समजताच स्थानिक नागरिकांनी मदतकार्य राबवत जखीमींना तातडीने हिमायत नगरच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अपघातातील ११ जखमी भाविकांनवर हिमायतनगरच्या रुग्णालयात उपचार सूरु आहेत.

१४ अती जखमी भाविकांनवर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला असल्याचे समजते आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा