हेल्दी ब्रेकफास्ट महत्त्वाचा

पुणे, २७ ऑक्टोबर २०२२ : अनेकदा प्रत्येकाला हा प्रश्न पडतो की, नाष्टा महत्त्वाचा का? या प्रश्नाचं शास्त्रीय उत्तर आहे, हो… ब्रेकफास्ट MUST. बारा तास झोप झाल्यानंतर पोटात गॅस्ट्रिक अँसिड तयार होते. त्याचा परिणाम म्हणजे पोटात आग पडते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर पोटभर नाष्टा हा महत्त्वाचा असतो. सर्व चयापचय क्रियेसाठी नाष्टा करणं कायम जरुरी आहे. नाष्ट्यात काय खाल?

सर्वसामान्य भारतीय हे नाष्ट्यात पोहे, उपीट, ऑमलेट, उकडलेली अंडी, फळे यांसारख्या पदार्थाला प्राधान्य देतात. तर पाश्चात्य देशात सॅलेड, बर्गर किवा सॅन्डविचसारख्या गोष्टी खाण्यासाठी प्राधान्य देतात.

वास्तविक उकडलेली कडधान्ये हा उत्तम नाष्टा होय. त्याचबरोबर मखणा, मुसली किंवा ओटस याकडे सध्या महिला वर्ग वळताना दिसत आहे.

नाष्ट्याचे उपयोग

शरीरातील उर्जेचा स्त्रोत कायम ठेवण्यास नाष्टा कायम उपयोगी ठरतो.

तुमच्या मेंदूची ताकद नाष्ट्यामुळे वाढते.

नाष्ट्यामुळे वजनावर नियंत्रण रहाते.

नाष्ट्यामुळे अनेक आजारांपासून आपण दूर रहातो.

मन आणि चित्त एकाग्र करण्यास ब्रेकफास्ट मदत करते.

तुमचा बिघडलेला मूड हा ब्रेकफास्टमुळे आनंदात बदलण्यास मदत होते.

तुमचे हृदय सक्षम करण्यास मदत होते.

तुमची प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

एकुणात संपूर्ण शरीराचा समतोल साधण्यासाठी ब्रेकफास्ट महत्त्वाचा आहे, हे खरं.

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा