पुणे, दि.२१ सप्टेंबर २०२०: समाजातील पिडीत, शोषित आणि दीनदुःखी लोकांच्या मदतीला धावून जाणे हाच खरा धर्म. हेच मनात ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने भारतीय जनता पार्टी, हिंदूगर्जना प्रतिष्ठान आणि साने गुरुजी तरुण मंडळाच्या वतीने ‘सेवा सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले आहे. विविध संस्थांना सलग सात दिवस मदतीचा हात पुढे करून आम्ही ‘सेवा सप्ताह’ साजरा करीत आहेत.
आज, मंगळवारी रुईया मूकबधीर, कर्णबधीर विद्यालयाला मदत करण्यात आली. रुईया विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शिंदे मॅडम, त्यांच्या सहकारी खिलारे मॅडम, भारतीय जनता पार्टीचे शहर सरचिटणीस गणेश घोष आणि दीपक नागपुरे, ‘भाजयुमो’चे प्रदेश सरचिटणीस आणि नगरसेवक सुशील मेंगडे, माजी नगरसेविका सौ. मनीषा धनंजय घाटे, भाजपाचे कसबा मतदारसंघाचे अध्यक्ष प्रमोद कोंढरे, भाजपाचे प्रभागाध्यक्ष अर्जुन खानापुरे आदी या वेळी उपस्थित होते.
रुईया महाविद्यालयाला या वेळी खुर्च्या, महापुरुषांच्या तसबिरी आणि प्रत्येक वर्गामध्ये लावण्यासाठी घड्याळ अशा वस्तू भेट देण्यात आल्या. त्याचप्रमाणे विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या पालकांना एक महिनाभर पुरेल इतका शिधा मदत स्वरुपात देण्यात आला.
न्यूज अनकट प्रतिनिधी : ज्ञानेश्वरी आयवळे.