कोरोनाला रोखण्यासाठी पुरंदर मध्ये आता होणार होम टू होम सर्वे

पुरंदर, दि. १० सप्टेंबर २०२०: पुरंदर मधील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पुरंदरच्या प्रशासनाने बाधित क्षेत्रामध्ये होम टू होम सर्व्हे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची सुरवात नीरा आणि वाल्हा येथून रविवार दिनांक १३ पासून करण्यात येणार असल्याची माहिती पुरंदरच्या तहसीलदार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

जिल्हा आपत्ती निवारण अधिकारी म्हणजेच जिल्हाधिकारी यांनी बाधित क्षेत्रातील कोरोना प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाय योजना करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार प्रथम टप्प्यात वाल्हा, नीरा, जेजुरी, सासवड या शहरातून ऍक्टिव्ह सर्व्हेलांस राबवण्यात येणार आहे.

रविवार दिनांक १३ रोजी वाल्हा व नीरा या गावांमधून सर्व्हे करण्यात येणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. त्याचबरोबर जेजुरी आणि सासवड या शहरातून सुद्धा लवकरच होम टू होम सर्वे केला जाणार असून त्याचीही तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

रविवारी नीरा व वाल्हा या गावातून होणाऱ्या सर्व्हे मध्ये होम टू होम सर्वे करून यामध्ये 95 पेक्षा कमी ऑक्सिजन लेव्हल असणाऱ्या लोकांची अँटीजेन टेस्ट घेण्यात येणार आहे. यासाठी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तपासणी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

रविवारी सकाळी आठ वाजल्यापासून या सर्व्हेला सुरुवात करण्यात येणार असून लोकांनी रविवारी घरी थांबावे. सर्वेसाठी येणाऱ्या लोकांना सहकार्य करावे असे आवाहन पुरंदरच्या तहसिलदार रूपाली सरनोबत यांनी केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा