थर्मल पॉवर प्लांटमध्ये झाला मोठा स्फोट, एकजणाचा मृत्यु तर एकजण जखमी

गडचिरोली, २७ ऑक्टोबर २०२२: गडचिरोली येथील देशाईगंज वडसा येथे एनर्जी थर्मल पॉवर प्लांटमध्ये आज सकाळी मोठा स्फोट झाला होता. या स्फोटात इंजिनिअरसह एक मजूर गंभीर जखमी झाले होते. इंजिनिअरवर रुग्नालयात उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यु झाला. एनर्जी थर्मल पॉवर प्लांटमध्ये प्रॉडक्शन लाईनची पाहणी करण्यासाठी संजय सिंग आणि एक मजूर गेले असता ते पाहणीकरत असतांना स्टीम लाईनचा अचानक स्फोट झाला.

हा स्फोट एवढा भीषण होता की, संजय सिंग आणि यांच्यासह मजूरही गंभीररीत्त्या जखमी झाले होते. त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण उपचार सुरु असतानाच संजय सिंग या इंजिनिअरचा मृत्यु झाला.

संजय यांच्या मृत्युमुळे त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. तर मजूरांवर रुग्नालयात उपचार सुरु आहेत. अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. तर या स्फोटामध्ये थर्मल पॉवर प्लांटमधील सामग्रीचं प्रचंड मोठं नुकसान झाले आहे. तर या स्फोटाच्या आवाजानं संपूर्ण परिसर हादरुन गेला होता. नेमका हा स्फोट कशामुळे झाला. हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा