चित्रपट सृष्टीला एका प्रकारे गडद ग्रहण,या दिग्दर्शकाची प्रकृती गंभीर

हैद्राबाद, १२ ऑगस्ट २०२०: जगाला कोरोनाचे ग्रहण लागले आसताना भारतातील मराठी चित्रपट सृष्टीला देखील एका प्रकारे गडद ग्रहण लागले असे म्हणणे वावगे ठरणार नाही. २०२० च्या सुरवाती पासून चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकारांनी जगाचा निरोप घेतला. तर काही कलाकार मोठ्या आजाराने ग्रासलेत. अशीच बातमी चित्रपट सृष्टीतून आली आहे.

प्रसिद्ध दिग्दर्शक निशिकांत कामत याला यकृताशी संबधित आजरामुळे हैद्राबादच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आसून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. तर त्याची प्रकृती हि चिंताजनक असल्याची माहीती समोर येत आहे. त्यात बाॅलिवुडच्या बाबा अर्थात संजय दत्तला देखील तिसरा टप्यातील फुफ्फुसांचा कॅन्सर झाला आसून तो लवकरच परदेशात उपचारासठी दाखल होणार आहे.

दिग्दर्शक निशिकांत कामत यांनी मदारी, दृश्यम, मुंबई मेरी जान, डोंबिवली फास्ट, फुगे, लय भारी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहेत त्या बरोबरच सातच्या आत घरात, राॅकी हॅण्डसम, जुली २, भावेश जोशी, मदारी या चित्रपटातून अभिनय देखील साकारला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा