फलटण तालुक्यातील निंभोरे येथील प्रति चैत्यभूमीत बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी

फलटण, सातारा ६ डिसेंबर २०२३ : फलटण तालुक्यातील निंभोरे येथील प्रति चैत्यभूमी समजल्या जाणाऱ्या बौद्ध विहारा मध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अस्थिकलशाचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त फलटण येथील नगरपालिका समोर असणाऱ्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी शहरातील विविध राजकीय पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले . तालुक्यातील व शहरातील बौद्ध विहार मध्ये सकाळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून त्रिसरण पंचशील घेण्यात आले.

निंभोरे तालुका फलटण येथे असणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेण्यासाठी फलटण बारामती इंदापूर माळशिरस खंडाळा सातारा आधी भागातील भीम अनुयायी ,यांनी मोठी गर्दी केली होती.

अभिवादना बरोबरच रक्तदान करून अनोखे अभिवादन केले आहे अनेक भीम अनुयायांनी रक्तदान करून बाबासाहेबांना अभिवादन केले आहे महापरिनिर्वाण दिनानिमित्त भीम गीतांचा गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

न्यूज अनकट प्रतिनिधी : आनंद पवार

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा