मांजरी उपबाजारात शेतकरी – व्यापाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी

मांजरी, दि. २६ ऑगस्ट २०२०: कोरोनाच्या प्रार्दुभावानंतर मांजरी उपबाजार पूर्वपदावर येत आहे. पुणे – सोलापूर महामार्गावरील कवडीपाठ ते पंधरा नंबर चौकापर्यंत भरणाऱ्या भाजी विक्रीत्यावर हडपसर पोलिसांनी व लोणी काळभोर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी व शेतकरी पुन्हा मांजरी उपबाजार याकडे वळत आहेत. त्यामुळे मांजरी उपबाजारात मोठ्या प्रमाणावर गर्दी वाढली आहे. मांजरी उपबाजारात आज मोठ्या प्रमाणावर शेतमालाची मोठ्या प्रमाणात आवक झाली होती.

मात्र व्यापाऱ्यांची संख्याही वाढलेली शेतकऱ्यांच्या मालाची झटपट विक्री होऊन काही प्रमाणात बाजारभावात वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. व महामार्गावर भरणाऱ्या उपबाजारात बाबत मार्केट कमिटीच्या वतीने वेळोवेळी पोलिसांना निवेदन देण्यात येत होते. परंतु पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने महामार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन अपघातदर्शक स्थिती निर्माण झाली होती.

त्यामुळे मांजरी ग्रामपंचायतीच्या वतीने हडपसर पोलिसांना तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलीस आयुक्त, यांना निवेदन दिले. त्या पत्राद्वारे कोरोनाचे संक्रमण वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यानंतर मात्र पोलिस प्रशासन तसेच पुणे मनपाच्या अतिक्रमण विभाग यांनी जोरदार कारवाई सुरू केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा