सीएसएमटी स्थानकात लोकलचा एक डबा घसरला, हार्बर लोकल सेवा विस्कळीत

मुंबई २६जूलै२०२२: सीएसएमटी रेल्वे स्थानकात प्लेटफॉर्म नंबर एक वरून लोकल ट्रेनचा एक डबा घसरला आहे. पनवेल लोकल ही सीएसएमटी रेल्वे स्थानकात प्लेटफॉर्म एक वरुन निघत असतांना ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती आहे.

लोकल पुढे जाण्याऐवजी मागे आली ती बफरला धडकली, त्यावेळी लोकलचा डबा घसरला. या घटनेची चौकशी करण्यात येईल, असे मध्य रेल्वेतील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. सीएसएमटी स्थानकातून सकाळी ९.३९ वाजता पनवेलच्या दिशेने निघालेल्या लोकलच्या मागील चौथ्या डब्याची दोन चाके रुलावरुन घसरली.

या लोकलला पुढे जाण्यासाठी सिग्नलही मिळला होता. मात्र ही लोकल पुढे जाण्याऐवजी मागे आली आणि बफरला धडकली. यामुळे लोकल वा बफरचे कोणतेही नुकसान झाले नाही. तर प्रवासीही जखमी झाले नाहीत. अपघाताची माहिती मिळताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

लोकलचा डबा पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु या अपघातात कोणीही जखमी झालेलं नाही. सीएसएमटी रेल्वे स्थानकातून हार्बर मार्गासाठी प्लेटफॉर्म नंबर एक आणि नंबर दोन वरुन लोकल ट्रेन रवाना होत असतात.

मात्र एका प्लेटफॉर्मवरच ही दुर्घटना घडल्याने आता फक्त दुसरा आणि एकमेव रेल्वे प्लेटफॉर्म हार्बर रेल्वे वाहतुकीसाठी उपलब्ध आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा