२०२० मधील मोठ्या घडामोडींवर एक नजर..

पुणे, ३० डिसेंबर २०२०: २०२० वर्षे संपण्यासाठी अवघे काही तास आता शिल्लक राहिले आसून या वर्षात कोणकोणत्या घडामोडी घडल्या? कुठे राजकीय उलथापालथ झाली?श्रीमंताची काय परिस्थिती होती? कोणत्या कंपन्यांनी या वर्षी छप्परफाड कमाई केली याबद्दल आपण आज जाणुन घेणार आहोत.

२०२० कोरोना काळात या कंपन्यांची छप्परफाड कमाई…..

फार्मा सेक्टर-कोरोनामुळे उद्ध्वस्त झाली. या काळात हेल्थ वर्कसचं जगणं कठीण झालं मात्र फार्मा कंपनीने या वेळेत खूप नफा कमवला. मास्क, सेनेटायझर, रोगप्रतिकारक शक्तीच्या औषधांनी चांगलाच फायदा करून दिला. औषधांची घरपोच सुविधा देणाऱ्या कंपन्या देखील चांगल्याच नफ्यात राहिल्या. तर इ-काॅमर्स सेक्टर- कोरोनामुळे यांच्यावर लोक मोठ्या प्रमाणात अवलंबून राहू लागले. त्यामुळे ॲमेझाॅन, फ्लिपकार्ट सारख्या कंपन्या फायद्यात राहू लागल्या.

अदाणी-अंबानी साठीचे २०२० वर्ष…..

भारतातील टाॅप श्रीमंत आसलेल्या अदाणी अंबानी साठी हे वर्ष चांगलेच गेले. ब्लुबर्ग बिलेनियर इंडेक्सनुसार गेल्या वर्षात सर्वाधिक संपत्ती उद्योगपती गौतम अदाणींची वाढली होती. त्यांची संपत्ती गेल्या वर्षी २.४ लाख कोटी रूपये होती. तर गेल्या वर्षच्या तुलनेत १.६ लाख कोटी रुपये वाढली आहे. अदाणी नंतर मुकेश अंबानींचा नंबर लागतो. त्यांची संपत्ती या डिसेंबरपर्यंत ५.६ लाख कोटी होती. तर गेल्या वर्षच्या तुलनेत १.३ लाख कोटी रुपयांनी ती वाढली आहे.

२०२० वर्षात रिल लाईफ हिरो रियलमधेही हिरो बनून आले….

देशात कोरोना महामारीमुळे २०२० हे वर्षात लोकांचे जगणंच कठीण झालं. तर सरकारच्या कुठल्याही नतयारीनिशी पुकारलेल्या लाॅकडाऊन मुळे श्रमिक मजुरांचे हाल झाले. तेव्हा रिल लाईफ मधील हिरो हे रियलमधेही हिरो म्हणून समोर आले. सोनु सुद ने तर कित्येक मजुरांना त्यांच्या घरी पोहचविले. तर तो मजुरांसाठी देवदूतच बनून आला.स रकार पेक्षा जास्त मजुरांना सुखरूप घरी पोहचविण्यात त्याने मोलाचा वाटा उचलला.

तर आंध्र सरकारच्या सीएम आणि पीएम रिलीफ निधी फंडात प्रसिद्ध आभिनेता प्रभास ने ५० लाख रूपये सीएम तर ३ कोटी रूपये पीएम रिलीफ फंडात निधी दिला. बाॅलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार ने ही मुंबई पोलिस आणि बीएमसीला निधी दिला.

२०२० वर्षात आंतरराष्ट्रीय घटनांनी जग हादरले….

कासिम सुलेमानींची हत्या: जानेवारी मधे अमेरिकेच्या हवाई हल्यात इरानी सेनाध्यक्ष कासिम सुलेमानींची हत्या झाली.

कोरोना: २०१९ च्या शेवटी आलेल्या या व्हायरसने २०२० या वर्षात संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात जखडले. तर कोट्यावधी लोकांना आपला जीव गमवावा लागला. या व्हायरसने २०२० मधे एक काळा इतिहास लिहिला म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

जाॅर्ज फ्लायडचा मृत्यू: अमेरिकेत पोलिस कोठडीत एका आफ्रिकन वंशाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यानंतर तिथे हिंसक पडसाद उमटले.

२०२० मधील राजकीय उलथापालथ…..

जपान चे प्रधानमंत्रीचा राजीनामा: शिंजो अबे
यांनी तब्येत अस्वस्थ आसल्यामुळे जापानच्या प्रधानमंत्री पदाचा राजीनामा दिला.जापानवर त्यांचा काळ २०२१ पर्यंत होता. साडे सात वर्षापर्यंत पदावर होते.

ट्रम्प सरकार पडले: अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षाची निवडणूकीचे रंग सगळ्या जगाने अनुभवले. यामधे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची सत्ता गेली. तर निवडणूकीत त्यांचा पराभव झाला आणि तिथे डेमाॅक्रॅटिक पक्षाचे जो बायडन निवडून आले. तसेच भारतीय वंशाची कमला हॅरिस यांनी उपराष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकून इतिहास घडवला.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा