कल्याण, १९ ऑगस्ट , २०२०: कल्याण डोंबिवलीमध्ये अनेक महत्वांच्या रस्त्यांवर सध्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरलं आहे . शहरांना जोडल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्यांवर सध्या रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता आहे हे ओळखणं आवघड झालंय. मात्र, कल्याण डोंबिवलीमध्ये सध्या हे रस्ते चिखल आणि खडीचा वापर करून बुजवले जात आहेत. त्यातीलच एक रस्ता म्हणजे कल्याण- मलंग रोडवर द्वारली गावाच्या रस्त्यावर सध्या मोठे खड्डे पडले आहेत .
या मोठ मोठ्या खड्यांमुळे या ठिकाणी अपघाताचं प्रमाण हे वाढल आहे. अनेक तक्रारी करून सुद्धा केडीएमसी प्रशासनाने अद्याप लक्ष दिलेले नाही असे नगरसेवक कुणाल पाटील यांनी सांगितले आहे. गणेशोत्सवापूर्वी हे खड्डे बुजवण्यासाठी नगरसेवक कुणाल पाटील यांनी कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाचा वारंवार पाठपुरावा केला. मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप नगरसेवक कुणाल पाटील यांनी केला आहे. द्वारली येथील रस्ता चांगला बनवा अन्यथा, आंदोनल करणार असा इशारा त्यांनी दिला आहे.
अथक प्रयत्नानंतर या रस्त्याचे रुंदीकरण झाले, मात्र काही ठिकाणी विजेचे खांब रस्त्याचा मध्यभागी आले आहेत. दुसरीकडे रस्त्याची तात्पुरती डागडुजी करण्यात सुरवात केली. महापालिकेने खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले खरे मात्र कोल्ड आसफ्लाट वापरण्या ऐवजी चिखल मिश्रित खडीचा वापर केला जात आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांच्या समस्येकडे लक्ष द्यावे असे आवाहन कूणाल पाटील यांनी केले आहे .
न्यूज अनकट प्रतिनिधी : राजश्री वाघमारे